आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुकाचे दुसरे पती आहेत आशुतोष राणा, आईवडिलांऐवजी नणंदेला करावे लागले होते कन्यादान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या लव्ह स्टोरींविषयी सामान्य प्रेक्षकांना तसे पाहता ठाऊक असते. मात्र काही कलाकार असेही आहेत, जे आपल्या लव्ह लाइफविषयी फारसे बोलणे पसंत करत नाहीत. अशाच काही कलाकारांच्या लव्ह स्टोरीविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आजच्या भागत अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता आशुतोष राणा यांच्या लव्ह लाइफविषयीची तुम्हाला जाऊन घेता येणारेय.

 

'हम आपके है कौन'मधून लोकप्रिय झाली रेणुका...
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुकाने 1992 मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 1993 ते 2001 या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले. काही सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर रेणुकाने अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न करुन अभिनयाला काही काळासाठी रामराम ठोकला. आता पुन्हा एकदा रेणुका फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव झाली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये रेणुका झळकणार आहे. 'हम आपके है कौन'नंतर तब्बल 23 वर्षांनी रेणुका आणि माधुरी दीक्षित एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 'बकेट लिस्ट' हे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. तर हिंदीत '3 स्टोरी'ज या चित्रपटात रेणुका म्हाता-या स्त्रीच्या रुपात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 

आशुतोष यांच्यासोबतचे रेणुकाचे हे दुसरे लग्न असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? या दोघांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त  LOVE LIFE या सीरिजमधून जाणून घेऊयात कशी सुरु झाली होती रेणुका-आशुतोषची लव्ह स्टोरी आणि कसे झाले लग्न...

बातम्या आणखी आहेत...