आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मी कथेला साजेशी आहे प्रसाद-मंजिरीची Love Story, विरोध-संघर्षातून काढले दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे पसंत करत नाहीत. प्रोफेशनल आणि खासगी आयुष्य हे कलाकार वेगळे ठेवतात. त्यामुळे या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे ठाऊक नसते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने अशाच काही कलाकारांच्या लव्ह स्टोरीविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


Love Life या सीरिजच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत  मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांच्या लव्ह स्टोरीविषयी... 


एखाद्या फिल्मी कथेला साजेशी अशी दोघांची लव्ह स्टोरी. यांच्या लव्ह स्टोरी घरच्यांकडून होणार विरोध, लग्नानंतरचा उदरनिर्वाहासाठी करावा लागणारा संघर्ष, असं सर्वकाही आहे. चला तर मग जाणून घेऊया, मराठी इंडस्ट्रीतील या क्यूट कपलच्या लव्ह स्टोरीविषयी... 


आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसादने सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. इतकेच कशाला ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसादने आपली वेगळी छाप उमटवली आहे. प्रसादने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. स्वभावाने शांत असलेल्या प्रसादने मंजिरीची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले. या दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे. 


पुढे वाचा, कशी झाली होती दोघांची पहिली भेट... 

बातम्या आणखी आहेत...