आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड, सेल्फी, धमाल-मस्ती रंगला झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा, बघा INSIDE PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी रात्री मुंबईत झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अमेय वाघ आणि मिथिला पालकर स्टारर मुरांबा या चित्रपटाने तब्बल पाच श्रेणीत अवॉर्ड पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट गीतकार हे पाच पुरस्कार मुरांबाने आपल्या नावी केले.

 

'रिंगण' या चित्रपटातील भूमिकेसाठी साहिल जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा झी चित्र गौरव पुरस्कार मिळाला.  रिंगण या चित्रपटाला एकुण चार पुरस्करांनी गौरविण्यात आले. या  निर्मात्या विधी कासलीवाल यांनी याची माहिती देताना सोशल मीडियावर लिहिले, "What a night!! Totally unexpected and truly wonderful!!! 4 awards for #LandmarcFilms #BestFilmJury #Ringan #BestChildActor #SahilJoshi #BestActorJury #AbhayMahajan #BestDirector #NachiketSamant #Gachchi So so proud of both teams!!! #Wohooo #ZeeGauravAwards #2018 #AboutLastNight Thank you #Zee"

 

या अवॉर्ड सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी बघायला मिळाली. पुरस्कारांची रेलचेल, कलाकारांचे सादरीकरण, सेल्फी, धमाल-मस्तीत हा सोहळा पार पडला. अभिनेत्री मयुरी वाघ हिने रेड कार्पेटवर अँकरिंग करुन कलाकारांना बोलते केले. 

 

या सोहळ्याचा आतील नजारा नेमका कसा होता, हे दाखवणा-या छायाचित्रांचे खास कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर बघा, झी चित्र गौरव 2018 चे INSIDE PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...