आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLच्या अंतिम सामनादरम्यान मराठीतून कॉमेंट्रीचा घ्या आनंद, माधुरी-स्वप्नीलची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशात सर्वाधिक चर्चा आहे ती VIVO IPL २०१८ ची... यंदाच्या पर्वात अंतिम फेरीचे दावेदार कोण ठरणार आणि कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक खुशखबर आहे. VIVO IPLचा २७ मे रोजी होणारा अंतिम सामना प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह पाहता येणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत.


मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आता VIVO IPL २०१८च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्यानं त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मराठी माणसांना पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे, क्रिकेट आणि मराठी भाषेच्या जल्लोषात प्रेक्षकही नक्की सहभागी होतील आणि आयपीएल आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी भावना स्वप्नील जोशीनं व्यक्त केली.


अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे, ज्यात माधुरी दीक्षित आणि स्वप्नील जोशी सहभागी होतील. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे. त्यामुळे मराठीतून अंतिम सामना पाहण्याची ही दुर्मिळ संधी चुकवू नका. VIVO IPL २०१८ चा अंतिम सामना पहा २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून फक्त स्टार प्रवाहवर, कारण खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे.

बातम्या आणखी आहेत...