आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर हा आहे \'बानू\'चा खरा \'शिव\', मराठी इंडस्ट्रीतील \'या\' कलाकारांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जय मल्हार' मालिकेतील बानू म्हणजेच ईशा केसकर आणि 'काहे दिया परदेस' मालिकेतील शिव अर्थात ऋषी सक्सेना यांच्यात सध्या काही रंगत आहे की काय अशा चर्चा सुरु आहेत. त्याचे कारण आहे ऋषीने इन्सटावर शेअर केलेला फोटो. ऋषी सक्सेनाने  पोस्ट केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  


ऋषीने महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला 'इट्स बीन अ व्हाईल नाऊ' म्हणजेच 'या गोष्टीला बराच काळ झाला' अशी कॅप्शन दिली होती. त्यामुळे या फोटोवर अनेकांनी तुम्ही 'डेट करत आहात का?' अशा प्रश्नांपासून 'नाईस जोडी' अशा कमेंट्सही केल्या आहेत. केवळ ऋषीच नव्हे तर ईशानेही तिच्या इन्सटाग्रामवर ऋषीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ऋषी आणि ईशाचे काही खास PHOTOS.....

बातम्या आणखी आहेत...