आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशोले', 'डॉन', 'सीता और गीता', 'त्रिशूल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे रायटर जावेद अख्तर आज त्यांचा 73वा वाढदिवस साजरा करत आहेत. जावेद यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वालियरमध्ये झाला. जावेद यांच्या नावाचा अर्थ जादू आहे. जावेद यांचे नाव त्यांचे वडील आणि प्रसिद्ध शायर जां निसार अख्तर यांनी त्यांची एक कविता 'लम्हा-लम्हा किसी जादू का फसाना होगा' मधून त्यांचे नाव ठेवले. प्रोफेश्नल लाईफ तर त्यांची चांगली होती पण जावेद यांच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक चढउतार आले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पत्ते खेळता खेळता जावेद यांनी त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांना प्ररोज केले होते. त्यानंतर लग्नाचे प्रपोजल घेऊन सलमान खानचे वडील सलीम खान त्यावेळी जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी यांच्या आईला भेटले होते. भोपाळच्या सोफिया कॉलेजमधून केले ग्रॅज्युएशन...
जावेद यांनी 1972 साली 'सीता और गीता' चित्रपटादरम्यान जावेद यांची भेट हनी ईराणीसोबत झाली. शूटिंगवेळी ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. या चित्रपटात हनीने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. एका इंटरव्युमध्ये हनीने सांगितले की, एकदा पत्ते खेळताना जावेद खेळात हारत होते तेव्हा हनीने 'मी तुमच्यासाठी पत्ते काढते' असे म्हटले. तेव्हा जावेद यांनी 'जर पत्ते चांगले निघाले तर मी तुझ्याशी लग्न करेल' असे सांगितले. पत्ते खरोखरच चांगले निघाले आणि जावेद अख्तर म्हणाले 'चल आता आपण लग्न करुया'
जावेद जेव्हा हनीशी लग्न करु इच्छित होते तेव्हा ते 27 तर हनी 17 वर्षाच्या होत्या. प्रेमात पडलेल्या जावेद यांनी सलीम खान यांना हनीच्या आईसोबत बोलण्यासाठी पाठवले होते. हनीच्या आईला हे नाते मान्य नव्हते. हनी गरीबीला वैतागून नक्की घरी येईल असे त्यांनी म्हटले. घरच्यांच्या मर्जीविरुद्ध काही महिन्यांनी दोघांनी लग्न केले पण स्वतःचे घर नसल्याने हनी आणि जावेद हनीच्या बहिणीच्या घरी एका खोलीत राहु लागले.
लग्नानंतर त्यांचे जीवन आर्थिक हलाखीत गेले. हनीने मुलगी झोयाला जन्म दिला. 1980 साली जावेद यांचे प्रेम शबानावर जडले. अफेअरबद्दल कळाल्यावर हनी आणि जावेद यांच्या नात्यात दुरावा आला. 1974 साली फरहानटा जन्म झाला. दोन मुलांसाठी जावेद हनीला घटस्फोट देण्यास तयार नव्हते पण हनीने त्यांना शबानासोबत राहण्यास सांगितले आणि अशाप्रकारे घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी 1984 साली शबानासोबत लग्न केले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, जावेद अख्तर यांचे काही खास फोटोज्...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.