आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेमरी कार्ड'मधील 'मन उगाच हासते कशामुळे..' माझ्यासाठी 'साँग ऑफ द इअर' - जावेद अली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील प्रसिगद्ध गायक जावेद अलीने आगामी मराठी चित्रपट मेमरी कार्डसाठी एक सुरेख गाणे गायले आहे. या गाण्याबद्दल जावेदने माहिती देताना सांगितले की, "मी अनेक भाषांमध्ये मी गाणी गायलीत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र मेमरी कार्ड सिनेमातील लव्ह सॉंग माझ्यासाठी 'सॉंग ऑफ द इयर' असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी दिलेलं संगीत माझ्या काही खास कंपोझिशन्स मध्ये राहील. येत्या २ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची मी आतुरतेने वाट पाहतोय. अप्रतिम  आणि सायलेंट कंपोझिशन्सचं हे गोड कॉम्बिनेशन प्रेक्षकांना नक्की आवडेल."

 

गाणे रेकॉर्ड करण्यासाठी लागले 2 तास...
जावेदने सांगितले की, "माझे गुरु आणि संगीतातील आयडियल महोम्मद रफी यांच्या गाण्यांना असलेला गोडवा साधेपणा या दोघांनी नेमके पणाने या गाण्यात उतरविला. प्रेम ही एकमेव भावना जी जगाच्या पाठीवर कायम आणि सारखीच आहे अशी भावना गाण्यात ऐकायची असेल तर प्रितेश-मितेश यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं 'मन उगाच हासते कशामुळे, हृदय ही धडकू लागते कुणामुळे'!... मेमरी कार्ड सिनेमातील एव्हरग्रीन सॉंग रेकॉर्ड करताना मी सुद्धा जवळपास दोन तास घेतले आणि त्यातील प्रत्येक क्षण माझ्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करून घेतला. गाण्याची ३० सेकंदाची ओपनींग पियानो ट्यून तुम्हाला अलगद प्रेमाच्या दुनियेची सफर करून आणेल यात शंका नाही. कुठेही शब्दांची अतिशयोक्ती आणि जड फ्रेजेस नसल्यामुळे हे गाणं माझ्या प्रमाणे माझ्या मित्रांना देखील आवडलं."

बातम्या आणखी आहेत...