आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Poster Out: जॉन अब्राहमच्या पहिल्या मराठी फिल्मची रिलीज डेट ठरली, ही आहे स्टारकास्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’ (2013), ‘रॉकी हॅण्डसम’ (2016) आणि ‘फोर्स 2’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता मराठी चित्रपटसृष्टीकडेही वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करुन चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. जॉनची निर्मिती असलेला त्याचा पहिलावहिला मराठी चित्रपट यावर्षी 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

प्रसिद्ध नाटकावर आधारित आहे चित्रपट...

रंगभूमीवरील गाजलेल्या "सविता दामोदर परांजपे'  या नाटकावर  जॉनचा हा चित्रपट आधारित आहे. या नाटकाची कथा त्याला इतकी आवडली होती की त्यावर त्याने लगेच चित्रपट करायचे, असे ठरवूनच टाकले होते. नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची प्रमुख भूमिका होती.  

 

ही आहे चित्रपटाची स्टारकास्ट 

या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि रूपेश बापट या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘फुगे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे  यांनी ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  

 

ही आहे चित्रपटाची वनलाइन...

‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट थ्रिलरपट असून हि एका महिलेचे सूड कथा आहे. एक महिला तिला धोका देणाऱ्या पुरुषाचा कशाप्रकारे सूड घेते यावर हा चित्रपट आधारित आहे. 

 

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झाला प्रीमिअर...

अलीकडेच पार पडलेल्या अकराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपाला ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर शो सादर करण्यात आला. त्याला रसिकांची चांगली उपस्थिती होती.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाच्या सेटवरील काही निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...