आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: \'कागर\'मधून भेटीला येणार रिंकू राजगुरू, व्हिडिओमध्ये पाहा तिच्या दिलखेचक अदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता आहे. कारण, सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा पहायला मिळत आहेत. या व्हिडिओतून बऱ्याच काळानंतर रिंकू प्रेक्षकांसमोर आली आहे. 


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. तर उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांची चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रिंकूचा नायक कोण आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे. रिंकूचा नवा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. 


कागरच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रिंकू एका उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे. तसंच 'लवकरच येतोय कागर' असं सांगायलाही ती विसरत नाही. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. मात्र, रिंकूच्या या दिलखेचक अदा प्रेक्षकांना नक्कीच भुलवतील यात काहीच शंका नाही

 

बातम्या आणखी आहेत...