आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरोखरच मराठी मुलीच्या प्रेमात कैद झाला हिंदीभाषी 'शिव', व्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर केला रोमँटीक फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - गेल्या अनेक दिवसांपासून 'काहे दिया परदेस' फेम शिव म्हणजेच ऋषी सक्सेना रिलेशनशीमध्ये असल्याच्या चर्चा होत्या आणि ही मुलगी दुसरीतिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची लाडकी 'बानू' म्हणजेच ईशा केसकर असल्याची बातमी होती पण आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे कारण खुद्द ऋषीने त्याच्या इन्सटाग्रामवर ईशासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि सर्व चाहत्यांना व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

विशेष म्हणजे ऋषीने काहे दिया परदेस या मालिकेत शिव नावाच्या एका उत्तर भारतीय मुलाची भूमिका केली होती ज्याचे मराठी तरुणीवर प्रेम असते आणि त्यांचे लग्नही होती. आता खऱ्या आयुष्यातही उत्तर भारतीय असलेल्या शिवला ईशारुपाने मराठी तरुणीच व्हॅलेंटाईन म्हणून मिळाली आहे. ऋषीने इन्सटाग्रामवर शेअर केलेला रोमँटीक फोटो पाहून हे दोघे एकमेकांच्या फारच प्रेमात असल्याचे समजते. या बातमीमुळे ईशा आणि ऋषी या दोघांचे चाहते नक्कीच आनंदात असतील.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ऋषी आणि ईशाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...