आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कट्टी बट्टी\' फेम अश्विनी ख-या आयुष्यात आहे उच्चशिक्षित, हे आहे तिचे Education

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या झी युवा वाहिनीवर 'कट्टी बट्टी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत.  पूर्वा लग्नानंतरही तिचं पीएचडीचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवते. पडद्यावर पूर्वा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी       कासार वठवत आहे. या व्यक्तिरेखेप्रमाणेच अश्विनीचा ही खऱ्या आयुष्यात उच्च शिक्षणाकडे कल आहे. 


उच्चशिक्षित आहे अश्विनी कासार... 
अश्विनी ही अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे तसेच तिने लॉमध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात तिने वकिलीची प्रॅक्टिस देखील केली आहे. शिक्षण हे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मजबूत हत्यार आहे आणि अभिनय करतानासुध्दा त्याचा महत्वाचा वाटा आहे असे अश्विनीला वाटते. एक असाधारण अभिनेत्री बनून सुध्दा अश्विनीचे मत आहे की, तिच्या शिक्षणाचा तिला फायदा झाला. पडद्यावरील जीवनात शिक्षणाला अतिशय महत्व देणारी पूर्वा आणि खऱ्या आयुष्यातील अश्विनी यांची शिक्षणाबद्दलची मतं सारखीच आहे.   

पुढे वाचा, पहिले शिक्षण पूर्ण केलं आणि मग अभिनयाकडे वळली अश्विनी....

बातम्या आणखी आहेत...