आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता हा हिंदी अभिनेताही करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, दिसणार मुख्य भूमिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीची बॉलिवूडला पडलेली भूरळ काही नवी गोष्ट नाही. असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांना मराठी चित्रपटसृष्टीने आकर्षित केले. पाहुणा कलाकार असो अथव मुख्य भूमिका बॉलिवूड कलाकार नेहमीच मराठी चित्रपटात रुची घेताना दिसतात. आता मराठी चित्रपटसृष्टीत अजून एका हिंदी कलाकाराची एंट्री होणार आहे आणि ते नाव आहे के. के. मेनन. 

 

‘एक सांगायचंय… UNSAID HARMONY’ (एक सांगायचंय… अनसेड हार्मनी) या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेता के.के. मेनन मुख्य भूमिका साकारणार आहे. देवी सातरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण 9 मार्चला सुरु होणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, के.के.मेनन यांचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...