आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकी माटेगावकरने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला वाढदिवस, म्हटले 'थँक्यु आजी-आजोबा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. ह्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तिच्या फॅन्सनी तिला विविध कार्ड, ग्रिटींग आणि कविता लिहून पाठवल्या ज्या तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या आहेत. 

 

केतकीने तिचा हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तिने मातोश्री वृद्धाश्रमला भेट देत तेथील आजी-आजोबांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी मिळालेल्या प्रेमाने भारावलेल्या केतकीने इन्सटाग्रामवर तिच्या तेथे झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. यावेळी तिला तिचे आवडते कॅण्डल्स, मायकल जॅक्सनचा छोटा स्टॅच्यु हे गिफ्ट मिळाले. तिच्या आवडीच्या गोष्टी जाणीवपूर्वीक आणल्याबद्दल तिने तिच्या फॅन्सचे पोस्टद्वारे आभारही मानले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, केतकी माटेगावकरने शेअर केलेले वाढदिवसाचे काही Photos...

बातम्या आणखी आहेत...