आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकी माटेगावकरने इन्सटाग्रामवर पार केला 500Kचा टप्पा, फोटो शेअर करत फॅन्सला म्हटले थँक्यु!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकरने आज तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर 500Kचा टप्पा ओलांडला आहे. हा आनंद फॅन्सबरोबर शेअर करत केतकीने लिहीले आहे की, First Milestone Achieved. Just hit the 500k followers! I thank & appreciate each one of you for supporting & showering your love & blessings on me in this journey!Thank you. All my Love. -Ketaki Mategaonkar. Let's hit the next milestone soon :) 

 

 22 फेब्रुवारी 1994 रोजी नागपूर येथे जन्मलेली केतकी माटेगावकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात गायिका म्हणून केली. सारेगामापा लिटील चॅम्पसमध्ये केतकीने तिच्या गायकीने सर्वाचे मन जिंकून घेतले होते. केतकीचा आवाज जसा गोड तसेच ती दिसतेही सुंदर त्यामुळे तिला चित्रपटाच्या ऑफर्सही येऊ लागल्या आणि तिने साईन केला तिचा पहिला चित्रपट 'शाळा'..

'शाळा' या चित्रपटात केतकीने नऊ वर्षाच्या मुला-मुलीचे शाळकरी प्रेम सुंदररित्या पडद्यावर उतरवले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अंशुमन जोशी या कलाकाराने भूमिका केली होती. त्यानंतर केतकीने काकस्पर्श, टाईमपास, फुंतरु यांसारख्या चित्रपटातही काम केले. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणारी केतकी जेव्हा मॉर्डन रुपात प्रेक्षकांसमोर आली तेव्हाही तिला प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळाले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, केतकी माटेगावकरचे काही सुंदर Photo..