आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BBDay7:\'खूर्चीसम्राट\' टास्कदरम्यान मेधाने टाकला अंगावर कचरा, सदस्यांच्या भावनांचा उद्रेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बिग बॉस मराठी घरात काल खूर्चीसम्राट हा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान घरात दोन गट तयार करण्यात आले होते. पहिल्या गटात आस्ताद काळे हा प्रमुख होता आणि  त्याच्या टीममध्ये पुष्कर जोग, सई लोकूर, उषा नाडकर्णी, मेधा धाडे, अनिल थत्ते, विनीत भोंडे, श्रतुजा धर्माधिकारी हे होते तर दुसऱ्या टीमची प्रमुख रेशम टीपणीस होती आणि तिच्या टीममध्ये राजेश श्रृंगारपुरे,  भूषण कडू, सुशांत शेलार, स्मिता गौंडकर, जुई गडकरी हे होते. 

 

या टास्कदरम्यान टीम रेशम यांना खूर्चीवर बसण्यास सांगितले होते आणि इतर टीमला रेशम टीमला खूर्चीवरुन हटवण्याचे हे टास्क होते. या टास्कमध्ये जुई गडकरी, स्मिता गौंडकर यांना टार्गेट करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंगावर शॅम्पू, फोम आणून टाकले. त्यानंतर मेधा धाडेने किचनमधील कचरा जुई, स्मिताच्या अंगावर टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर टीम रेशमचे सदस्य सुशांत, राजेश, रेशम यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी स्वतःहून खूर्ची सोडली आणि अशाप्रकारे 1 तास 40 मिनिटात हा टास्क संपला. 

 

या टास्कचे पडसाद असे उमटले की त्यानंतर घरामध्येही घमासान पाहायला मिळाले. सर्वांनी मेधा धाडेसला टार्गेट केले आणि त्यानंतर मेधा धाडेसह टीममधील इतर सदस्य जसे की पुष्कर, सई, उषा यांनी माफी मागितली. आज मात्र टीम आस्ताद खूर्चीसम्राट टास्कमध्ये सहभाग घेणार आहेत आणि यादरम्यान आता घरात का घडते आणि टीम रेशम त्यांचा कशाप्रकारे बदला घेते हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खूर्चीसम्राट टास्कदरम्यानचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...