आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day:वयाच्या 50शीतही कमालीच्या देखण्या आहेत किशोरी शहाणे, लहानपणी होती सीए बनण्याची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आज त्यांचा 49वा वाढदिवस साजरा करत आहेत. 23 एप्रिल 1968 साली किशोरी यांचा जन्म पुणे येथे झाला पण सर्व बालपण मुंबईत पार पडले. किशोरी शहाणे या केवळ अभिनेत्रीच नाही तर क्लासिकल डान्सरही आहेत. 'माझा पती करोडपती', 'प्रेम करुया खुल्लम खुल्ला' यांसारख्या चित्रपटांतून नावारुपाला आलेल्या किशोरी यांनी नव्वदीचे शतक गाजवले आणि आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'जाडूबाई जोरात' या मालिेकमध्ये अनेक वर्षानंतर किशोरी शहाणे मराठी इंडस्ट्रीक़े वळल्या आणि त्यातील तेजस्विीनी प्रधान या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळविली. आज किशोरी शहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही खास गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. अकरावीत असताना झाला होता पहिला चित्रपट रिलीज.. . 
 
मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना किशोरी शहाणे यांनी मिस मिठीबाई हा किताब मिळवला. विशेष म्हणजे अकरावीत असताना पहिला चित्रपट आला 'प्रेम करुया खुल्लम खुल्ला' हा त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता आणि टीवाय बीकॉम पर्यंत किशोरी यांनी 20हून अधिक चित्रपटात काम केले होते. किशोरी शहाणे यांना लहानपणी सीए बनण्याची इच्छा होती पण अगदी लहानपणापासून नाटक, सिनेमे करत असताना त्यांना हे क्षेत्र न सोडण्याचा सल्ला सर्वांनी दिला आणि अखेर त्यांनी सीए न बनता अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पंजाबी चित्रपट दिग्दर्शकाशी थाटला आहे संसार...
बातम्या आणखी आहेत...