आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलींद सोमणच्या एअर होस्टेस पत्नीविषयी या काही गोष्टी माहीत आहेत का तुम्हाला?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 52 वर्षीय अभिनेता मिलींद सोमणने त्याच्याहून 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत विवाह केला आहे. अलिबाग येथे मिलींद-अंकिताच्या लग्नाचे विधी पार पडले. मिलींद सोमणचे हे दुसरे लग्न आहे. मिलींदने याअगोदर जुलै 2006 साली फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoiसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या तीन वर्षानंतर हे दोघे विभक्त झाले. मिलींद जवळपास दीड वर्षापासून अंकिताला डेट करत होता आणि आता हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. 

 

अंकिताला बोलता येतात अनेक भाषा...
दिल्लीत राहणारी अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. 2013 साली अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रु म्हणून काम करणे सुरु केले होते. मुळची आसामी असलेल्या अंकिताला हिंदी, इंग्रजी, फ्रेंड, बंगाली या भाषा बोलता येतात. नोव्हेंबर 2015 साली अंकिताने मिलींदसोबत पहिली 10 हजारी मॅरेथॉन कम्पलीट केली होती.

 

12 वर्षापूर्वी केले होते पहिले लग्न...

मिलींदने जुलै 2006 रोजी फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoiसोबत लग्न केले होते. Mylene सोबत मिलींदची पहिली भेट गोवा येथे 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'च्या सेटवर झाली होती. तीन वर्षानंतरहे दोघे विभक्त झाले. यानंतर मिलींदचे अफेअर मॉडेल शहाना गोस्वामीसोबत होते तर एक्स मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद चर्चेत होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता कंवरचे काही खास फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...