आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडस्ट्रीत येण्याअगोदर जीम इंस्ट्रक्टरचे काम करायचा हा 'राक्षस' अॅक्टर, 'बाहुबली'साठी केले आहे डबिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटात कधी नायकाची तर कधी खलनायकाची भूमिका करुन प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता शरद केळकर आगामी चित्रपट 'राक्षस'मधून आपल्या भेटीला येणार आहे. भरदार शरीरयष्टी, देखणा चेहरा आणि भारदस्त आवाज याच्या जोरावर चित्रपटात उत्तमोत्तम भूमिका साकारणारा शरद कधीकाळी जीम इंस्ट्रक्टरचे काम करत असे पण आज शरद केळकर 

 

लहानपणीच हरवले वडिलांचे छत्र..
शरद केळकरच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. तेव्हापासून आई आणि मोठ्या बहिणीनेच त्याचा सांभाळ केला. शरद मराठी कुटुंबातील असला तरी त्याचे मुळ गाव मध्य प्रदेश येथील ग्वालियर हे आहे. शरदने ग्वालियरच्या एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

 

एमबीएतून शिक्षण पूर्ण केले तरी शरदचा ओढा फॅशन जगताकडे होता. शरद जेव्हा 7 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आला तेव्हा त्याला आला तेव्हा Grasim Mr India 2002 या स्पर्धेबद्दल शेवटच्या दिवशी कळाले. त्याच वेळी घाईघाईत त्याने रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी शरद जीम इन्सट्रक्टरचे तसेच एअरटेलमध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. त्यानंतक केवळ एका महिन्यात शरदने जवळपास 25 शोमध्ये रॅम्पवॉक केला. शरद केळकर Grasim Mr. India finalist बनला. त्यानंतर 2004 साली शरदने 'आक्रोश' या दुरदर्शनवरील मालिकेतून इंडस्ट्रीत प्रवेश केला. शरदने पती,पत्नी और वो हा शो 2009 साली होस्ट केला.

 

'बाहुबली'साठी केली डबिंग..

दमदारल आवाजाचा मालक असलेल्या शरद केळकरने बाहुबली चित्रपटात प्रभाससाठी डबिंग केले आहे. प्रोफेशनल डबिंग आर्टीस्ट नसल्याने सुरुवातीला बाहुबलीमधील प्रभासचा आवाज शरदचा आहे यावर लोकांचा विश्वास बसला नाही त्यात दिग्दर्शक करण जोहरचाही समावेश आहे. 
- डबिंग करताना भाषेची अडचण येऊ नये यासाठी शरद अगोदर पूर्ण चित्रपट पाहणे पसंत करतो. शरदने केवळ पाच दिवसात बाहुबली चित्रपटाचे डबिंग केले. पहिला सिरीजसाठी जास्त वेळ लागला होता पण दुसरी सिरीज पाच दिवसात पूर्ण केली असे त्याने सांगितले.


पुढच्या स्लाईडवर वाचा, शरदविषयीची काही खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...