आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुखच्‍या \'माऊली\' सिनेमाचे संगीतकार कोण आहेत माहितीये का? वाचून व्‍हाल झिंगाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुखने त्‍याचा आगामी सिनेमा 'माऊली'ची नुकतीच हटक्‍या अंदाजात घोषणा केली. आतापर्यंत सिनेमाच्‍या घोषणेमध्‍ये सिनेमातील हीरो, हिरोईन कोण असेल याबाबत उत्‍कंठा वाढवली जायची किंवा त्‍यांची ओळख करून देऊन प्रेक्षकांना आ‍कर्षित करण्‍याचा प्रयत्‍न केला जायचा. मात्र रितेशने प्रथमच सर्वात आधी सिनेमाच्‍या संगीतकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. याचा एक व्हिडिओ रितेशने सोमवारी ट्विट केला असून याबद्दल अनेकांनी पडद्यामागील कलाकारांना अशाप्रकारे पडद्यावर स्‍थान दिल्‍याबद्दल रितेशचे कौतुक केले आहे.  

 

कोण आहेत 'ते' संगीतकार 
अवघ्‍या महाराष्‍ट्राला आपल्‍या गाण्‍याने 'याड' लावणारे ते संगीतकार आहेत अजय-अतुल. व्हिडिओमध्‍ये रितेश प्रथम स्क्रिनकडे पाहून विचारतो की, 'माऊली' या चित्रपटाचे म्‍यूझिक डायरेक्‍टर कोण आहेत माहितीए का तुम्‍हाला?' नंतर धुमधडाक्‍यात अजय-अतूलची ओळख करून दिली जाते. रितेश देशमुखच्‍या या अनोख्‍या पद्धतीने चित्रपटाच्‍या संगीताबद्दल आता उत्‍सुकता वाढली आहे. 


रितेश देशमुखचे होतेय कौतुक 
अशा पद्धतीने चित्रपटाची घोषणा करण्‍याबद्दल रितेशने म्‍हटले आहे की, 'चित्रपट निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिलेले असते. आणि प्रत्‍येकाला त्‍याबद्दल आदर आणि ओळख मिळाली पाहिजे. अजय अतुल यांनी या चित्रपटात आपल्या संगीतासह मोठ्या प्रमाणात सृजनात्मक मूल्ये सुद्धा दिली आहेत.' रितेशच्‍या या भुमिकेबद्दल अनेक युझर्सनी त्‍याचे अभिनंदन केले आहे. युझर्सनी म्‍हटले आहे की, 'आतापर्यंत कोणीही पडद्यामागील तंत्रज्ञांना अशा पद्धतीने समोर आणण्‍याचा विचार केला नाही. संगीतकारांना असा आदर दिलेला पाहून तुझ्याविषयीही आता आदर वाढला आहे.' 

 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रितेश देशमुखने ट्विट केलेला व्हिडिओ...


   

 

बातम्या आणखी आहेत...