आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Birthday: कुशलच्या लग्नात हे लोक ठरले होते व्हिलन, अशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोटधरुन हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस आहे. आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखल्या जाणा-या कुशलची पत्नी सुनयना एक कथ्थक नृत्यांगणा आहे. या दोघांचे लग्न 30 एप्रिल 2009 रोजी झाले असून त्यांच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांचा एक मुलगा आहे. कुशल आणि सुनयनाचे लव्ह मॅरेज आहे. पण सहजासहजी लग्नाला होकार मिळाला तर मग मजा ती काय... या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा नकार होता. मग सुनयनासोबत कुशलचे लग्न कसे झाले, हे स्वतः कुशलने एका मुलाखतीत सांगितले आहे.


चला तर मग आज कुशलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, कशी सुरु झाली दोघांची लव्ह स्टोरी आणि हे दोघे कसे पोहोचले लग्नमंडपात... 


सुनयनाला पहिल्यांदा बघितले तो क्षण... 
कुशल अंबरनाथला एका कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत त्याचे जबरदस्तीने नाव टाकण्यात आले होते. तोपर्यंत कुशलने 50-60 एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता. यासंदर्भात कुशलने मुलाखतीत सांगितले होते, "माझ्या आयुष्यात काही वेगळं असं घडत नव्हतं. तिथे सिद्धार्थ जाधवनेही परफॉर्मन्स केला होता. तो संपूर्ण कार्यक्रम मी पाहिलेला. त्यात एक मुलगी होती जिने ‘ती फुलराणी’मधला एक पॅच सादर केलेला. माझ्या भावाला तेव्हा मी म्हटलं की ही कमाल आर्टिस्ट आहे. तिच मला काम मला मनापासून आवडलं होतं. त्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा त्या मुलीला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळालं आणि मला त्या संपूर्ण एकपात्री स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. ती मुलगी म्हणजे सुनयना होती." 


पुढे वाचा,  नाटकात सुनयना झाली कुशलची बायको... आणि यासह बरंच काही... 

 

बातम्या आणखी आहेत...