आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्या-शितलीच्या प्रेमकहाणीची शत्रू आहे \'लागिर..\'ची \'जयडी\', रिअल लाईफ अंदाज पाहून वाटेल आश्चर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क -  मराठी प्रेक्षकांची लाडकी मालिका 'लागिर झाल जी' मधील जयडी अर्थात किरण धाणे व्हिलनची भूमिका करत आहे. शितली आणि अज्या यांचे एकमेकांवरील प्रेम पाहता जयडी त्यांना वेगळे करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असते. जयडी अज्याच्या मामाची मुलगी आहे आणि त्यांचे लग्न व्हावे, अशी तिच्या घरातील सर्वांचीच इच्छा आहे पण त्यात अडसर ठरणारी शितलीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात जयडी असते. 
 
मालिकेत जयडी गावरान भाषेत बोलताना तसेच तिचा पेहरावही त्याच पद्धतीचा दाखवण्यात आला आहे. पण जयडी अर्थात किरण धाने खऱ्या आयुष्यात स्टायलिश आहे. किरण नेहमीच सोशल साईटवर तिचे फोटो अपलोड करत असते. मुळची साताऱ्याची असलेली 21 वर्षाची किरणचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्याच झाले आहे. किरणचा लागीर झाल जी हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि तिने यातील खलनायिकेची भूमिका चोख निभावली आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, किरण धानेचे रिअल लाईफ तसेच 'लागिर झाल जी'च्या सेटवरील PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...