आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Album : \'लागिरं झालं जी\'मध्ये अजिंक्य आणि शीतल अडकले साताजन्माच्या गाठीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लगीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत अखेर शीतल आणि अजिंक्य लग्नाच्या बेडीत अडकले. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे एकत्र  आले  आहेत.

 

लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मे चा निघाला आणि सामाजिक भान जपत सामुहिक विवाहसोहळ्यात दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अजिंक्यप्रमाणेच शीतलचीही घोड्यावरुन वाजत गाजत वरात काढण्यात आली. 

 

 

शीतलच्या हातावर अजिंक्यच्या नावाची मेहंदी लागली आहे, संगीतमध्ये सर्व जण आनंदाने थिरकले. तसेच सौभाग्याचं लक्षण म्हणजेच हिरवा चुडा शीतलच्या हातात भरण्यात आला. लग्न जरी सामूहिक लग्न समारंभात झालं असलं तरी बाकीचे कार्यक्रम अगदी आनंदाने दोन्ही कुटुंबीय पार पाडले.  लग्नात शीतलने गुलाबी रंगाचा शालू परिधान केला. याशिवाय हिरव्या रंगाच्या नऊवारीतही तिचे रुप खुलले. या दोघांच्या लग्नाचे खास फोटोज झी मराठीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले आहेत. नववधू आणि वराच्या रुपात अजिंक्य आणि शीतल अतिशय देखणे दिसले.

 

या मालिकेत अजिंक्यची भूमिका अभिनेता नितेश चव्हाण साकारत असून शीतलच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी बोरकर आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, प्रेक्षकांच्या लाडक्या अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटोज..

 

फोटो साभार ः झी मराठी फेसबुक पेज 

बातम्या आणखी आहेत...