आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'लागीरं झालं जी'मध्ये उडणार अज्या-शितलीच्या लग्नाचा बार, लग्नाचे शूटिंग पडले पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लागीरं झालं जी' या मालिकेत आता अजिंक्य आणि शितल यांचे लग्न ठरले आहे. या दोघांच्या लग्नासाठी 30 मेचा मुहूर्तही ठरला आहे. या दोघांची लग्नपत्रिकाही समोर आली. त्यानंतर आज (22 मे) साता-यात अज्या आणि शितलीच्या लग्नाचे चित्रीकरण पार पडले. या चित्रीकरणाचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये अज्या अर्थातच अभिनेता नितेश चव्हाण हा शेरवानीत तर शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बोरकर गुलाबी रंगाच्या शालूमध्ये अतिशय देखणी दिसतेय. लवकरच हा भाग प्रसारित केला जाणार आहे.


जयडीनेही थाटले लग्न... 
अजिंक्यचे लग्न शितलसोबत ठरल्यानंतर जयडीचे स्वप्न भंग झाले.  जयडीचे अजिंक्यवर एकतर्फी प्रेम होते. पण आता तो कधीही आपला होऊ शकणार नाही, हे तिला कळून चुकले. म्हणूनच तिने गावातील एका अतिशय सर्वसाधारण दिसणा-या तरुणासोबत घरच्यांना न सांगता लग्न केले. आता मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे, असे जयडीने अज्याला सांगितले आहे. जयडीने घेतलेला हा निर्णय तिच्या कुटुंबीयांना मात्र मनापासून मान्य नाही. पण मुलीच्या सुखासाठी तिच्या आईवडिलांनी तिला आशीर्वाद दिला.

 

आता  यानंतर अजिंक्य आणि शितल यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार की, लग्नानंतर आणखी ट्विस्ट अँड टर्न येणार हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार हे नक्की... 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अज्या-शितलीची लग्नपत्रिका...

बातम्या आणखी आहेत...