आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh My God... या कारणांमुळे जयडी आणि मामींनी घेतला \'लागिरं झालं जी\'चा कायमचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर गेलंय. अज्याचं फौजी होण्यापर्यंतचा प्रवास आणि शितलीसोबतच लग्न प्रेक्षकांनी भरपूर पसंद केलं. या मालिकेतील दोन खलनायिका म्हणजे जयश्री आणि मामी. या दोघींनी अल्पावधीत या मालिकेला आपल्या नकारात्मक भूमिकेने ओळख मिळवून दिली. पण आता या मालिकेत अज्या - शितलीच्या लग्नानंतर एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट आहे  जयडी आणि मामी या दोघींनी मालिकेतून घेतलेली एक्झिट. मालिका अगदी टर्निंग पॉईंटला असताना जयडी म्हणजे किरण ढाणे आणि मामी विद्या साळवे यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. 

 

 

...नाईलाजाने सोडावी लागली मालिका 

अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयडी अर्थातच किरण ढाणे आणि मामी म्हणजेच विद्या साळवे यांनी मालिका नेमक्या कोणत्या कारणामुळे सोडली याचा उलगडा केला. अतिशय तुटपुंज्या मानधनात या मालिकेत काम करत असल्याचे दोघींनीही सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघीही प्रॉडक्शन हाऊसकडे मानधन वाढवून मागत होत्या. पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. इतर कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन मिळत असल्याचे दोघींनीही या मुलाखतीत सांगितले. शेवटी नाईलाजाने मालिकेचा निरोप घेतल्याची खंत दोघींनीही बोलून दाखवली.

 

प्रॉडक्शन हाऊस पुन्हा बोलावणार नाही याची खात्री...

मुलाखतीत विद्या आणि किरण यांनी प्रॉडक्शन हाऊस पुन्हा बोलावणार नसल्याची खात्री असल्याचेही सांगितले. विद्या साळवे म्हणाल्या, मालिकेने मला ओळख मिळवून दिली. पण आम्हीही टीम वर्क केलंय. माझ्यावर दोन मुलींची जबाबदारी आहे, एवढ्या तुटपुंज्या मानधनात काम करणे परवडणारे नव्हते, म्हणून नाइलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला. तर किरण ढाणे सांगितले, की विद्या साळवे यांना प्रॉडक्शन हाऊसकडून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण माझ्याबाबतीत मात्र तसा प्रयत्न झाला नाही. 

 

प्रेक्षकांचे मानले आभार...

अल्पावधीतच भूमिका लोकप्रिय  झाल्या याचा आनंद असून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल किरण ढाणे आणि विद्या साळवे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मुळच्या कुठल्या आहेत, मामी अर्थातच विद्या साळवे...

बातम्या आणखी आहेत...