आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लागिर झालं जी'चा विक्या म्हणतो, 'रील लाईफमध्ये फौजीचे आयुष्य जगण्याचा आहे सार्थ अभिमान'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहतो त्याच प्रमाणे लष्करीसंस्कृती सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहे. सैन्यात भरती होणारे कित्येकसे जवान हे महाराष्ट्राच्या मातीतले असतात. झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली लागिरं झालं जी ही मालिका फौजींच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेतील सर्व पात्र हे भूमिकेत जीव ओतून आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. यातील एक पात्र म्हणजे "विक्रम फौजी" म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका विक्या! 

 

विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण "लागीर झालं जी" या  मालिकेतील नुकताच भरती झालेल्या फौजीची भूमिका पार पाडत आहे. या मालिकेपूर्वी त्याचे आयुष्य एका साधारण तरुणासारखेच होते, पण देशभक्तीची भावना ही नेहमीच त्याचा मनात होती. निखिलच्या मनात फौजीबद्दलचा आदर आणि प्रेम यामुळेच त्याच्या  रील आयुष्यात "फौजी" ची भूमिका पार पाडण्यात तो यशस्वी झाला आहे.


पुढे वाचा, आणखी काय म्हणाला निखिल.. 

बातम्या आणखी आहेत...