आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर यांची पहिली कमाई होती 25 रुपये, बिकट परिस्थितीमुळे केले मराठी चित्रपटात काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी एका मध्यमवर्गीय मीडल क्लास कुटुंबात झाला होता. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लतादिदी ह्या पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या. लता मंगेशकर यांचे वडील रंगमंचावर कलाकार आणि गायक होते. 
 
पहिले गाणे गाण्यासाठी मिळाले होते 25 रुपये...
लतादिदी यांना प्रथमच स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला लतादिदी त्यांची पहिली कमाई मानतात. त्यांनी पहिल्यांदा मराठी चित्रपट 'किती हसाल'साठी एक गाणे गायले होते. लता यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर, बहीणी उषा मंगेशकर, आशा भोसले आणि मीना मंगेशकर यांनी गाण्यालाच त्यांचे करिअर म्हणून निवडले. हृदयनाथ मंगेशकर यांनी काही मराठी गाणेही गायले आहेत.

 

का नाही केले लग्न..
लता मंगेशकर यांनी लग्न केलेले नाही हे सर्वांनाच माहित आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, घरातील सर्वच जणांची जबाबदारी माझ्यावर आली होती यामुळे जेव्हाही लग्नाचा विचार मनात येत असे तेव्हा त्यावर अंमल करता येत नसे. मी फार कमी वयाची असतानाच काम करण्यास सुरुवात केली त्यामुळे मी कामातच जास्त गुंतून राहिले. वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांच्या निधनाने माझ्यावर इतकी जबाबदारी आली की मी लग्नाचा विचार मनातून काढून टाकला. 

 

वडिलांच्या मृत्यूनंतर केले चित्रपटांत काम..
पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर घरावर आर्थिक संकट कोसळले होते. वडिलांना शास्त्रीय गाणे फार आवडत असत म्हणून लता यांनी चित्रपटात गाणे गाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर घरखर्च चालविण्यासाठी लतादिदी यांनी मराठी-हिंदी चित्रपटांत गाणे गायला सुरुवात केली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लता मंगेशकर यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...