आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : अरे देवा... नंदिता काढणार लाडूला घराबाहेर, काय करतील अंजली-राणा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ती अगदी नकारात्मक व्यक्तीरेखा असलेली नंदिता वहिनी असो, ते सर्व महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत एका छोट्या पैलवानाची एंट्री पाहिली. गोंडस आणि गोलू पोलू लाडूच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्याची निरागसता तसेच खोडकरपणा प्रेक्षकांना भावला. 


लाडूला घरात ठेवायचं की नाही यावर शेवटी आबा निर्णय देतात की लाडू घरात राहाणार. आता लाडूच्या येण्याने राणा अंजलीच्या रोजच्या आयुष्यात बदल घडू लागले आहेत. त्याची जबाबदारी राणा आणि अंजलीवर आहे आणि ते ती अगदी चोखपणे पार पडत आहेत. हळू हळू लाडूशी घरातल्या सगळ्यांशी गट्टी जमतेय. लाडूच घरभर बागडणं सगळ्यांना आवडू लागलं आहे. पण घरातील एका व्यक्तीला त्याचं घरात त्याचा वावर आवडत नाही आहे आणि ते म्हणजे नंदिता वहिनी. तिला लाडू गायकवाडांच्या वाड्यात राहायला नको आहे आणि म्हणूनच ती त्याला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. 


लाडू देखील तितकाच हुशार आहे. नंदिताचं त्याच्यासोबत असलेलं वागणं बघून तो देखील नंदिताची चांगलीच खोड मोडतोय. सगळ्यांना हवाहवासा वाटणारा लाडू नंदिताला मात्र नकोसा झालाय आणि तिच्या स्वार्थासाठी तिला काही करून लाडूला घराबाहेर काढायचं आहे. पण नंदिता लाडूला घराबाहेर काढण्यात यशस्वी ठरेल का? लाडू नंदिताची अशीच खोड मोडून तिला वठणीवर आणेल का? हे प्रेक्षकांना येत्या भागांत पाहायला मिळणार आहे.

 

पुढे वाचा, कोण आहे लाडूची भूमिका करणारा हा बालकलाकार... 

बातम्या आणखी आहेत...