आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly Worldचे 5 अपडेट्स : संभाजीराजे-दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार! अमृताला मिळाली माईची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील घाडगे & सून, स्वराज्यरक्षक संभाजी, संगीत सम्राट 2, राधा प्रेम रंगी रंगली आणि गजर किर्तनाचा या कार्यक्रमाचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सुरुवात करुयात, झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेपासून... 

 

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान...


संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... मला इथे संधी मिळत नाही, तर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढणं साहाजिक आहे.


आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. तिथे नेमकं काय आहे? असं असताना खरा इतिहास टप्प्याटप्प्याने समोर आणणाऱ्या या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे बघणं कुतूहलाचं ठरणार आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं... या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय. 


आता संभाजीराजे- दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच  आता कसा सुटणार याकडे  प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जुलै महिन्यात याचा उलगडा होणार असल्याने हा महिना प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा आणि मालिकेसाठी कसोटीचा असणार आहे.

 

पुढे वाचा, 'घाडगे & सून'मध्ये सध्या काय सुरु आहे आणि त्यासोबतच 'गजर किर्तनाचा' आणि 'संगीत सम्राट 2' या कार्यक्रमांचेही लेटेस्ट अपडेट्स...

 

बातम्या आणखी आहेत...