आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लक्ष्मी सदैव मंगलम्\'च्या सेटवर बाब्याला सगळे म्हणतात \'चपडचपड\', वाचा कोण आहे हा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली 'लक्ष्मी सदैव मंगलम्' ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांना प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचं सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार यामुळे.  त्या गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेमध्ये मल्हार       म्हणजेच ओमप्रकाश, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त मालिकेमधील अजून एक पात्र आवडत आहे आणि ते म्हणजे बाब्या. 

 

बाब्या म्हणजे मालिकेमधील लक्ष्मीचा जीवाभावाचा मित्र. लक्ष्मी मालिकेमध्ये या बाब्याबरोबर गावामध्ये बरीच फिरताना दिसते, लक्ष्मीला कुठली दुखापत झाली, तिला कधी कोणाची गरज भासली की, हा बाब्या तिच्या बरोबर सावली सारखा असतो. लक्ष्मी बरोबर असलेला तिचा हा गोड मित्र तिच्या प्रत्येक जखमेवरील मलमच आहे. लक्ष्मी त्याच्यासोबत रमते, त्याच्या मिश्कील स्वभावामुळे, त्याच्या खोड्यांमुळे तिला तिच्या दु:खाचा क्षणभर का होईना पण विसर पडतो. या बाब्याचे आणि लक्ष्मीचे पडद्यामागे देखील खूप चांगले नाते आहे.

 

प्रत्येक मालिकेमध्ये एक लहान मुलं असलं की, दिवस कसा निघून जातो हे कळत नाही, थकव्याचा देखील विसर पडतो. संपूर्ण सेटवर चैतन्यपूर्ण वातावरण असते. सेटवर सगळ्यांच्याच मनामध्ये हि लहान मुलं त्यांची एक विशेष जागा निर्माण करतात. तसचं काहीसं लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेच्या सेटवर झाले आहे. मालिकेमधील बाब्या... बाब्या म्हणजे वेद आंब्रे. 

 

बाब्या अर्थातच वेदविषयी जाणून घ्या पुढील स्लाईडवर.... 

 

बातम्या आणखी आहेत...