आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाद्वारे मराठी चित्रपट 'लेथ जोशी'चे टीजर पोस्टर लाँच, १३ जुलैला होणार रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला लेथ जोशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियात लाँच करण्यात आलं असून, या पोस्टरमधून चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. 

अमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती   केली असून प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओजच्या सहकार्यकाने ह्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.

 

मंगेश जोशी हा नवा दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करत असून लेखनही त्यांचेच आहे.चित्रपटाचं टीजर पोस्टर खूपच लक्षवेधी आहे  त्यामुळे सोशल मीडियावर एकूणच चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

आजवर तब्बल २१ महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला असून  पुणे आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह बरेच पुरस्कारही या चित्रपटानं मिळवले आहेत. यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 

 

येत्या १३ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...