आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमबीए दिग्दर्शक तर इंजिनीयर लेखक अशा अफलातून जोडीचा चित्रपट प्रवास आहे 'लव्ह लफडे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटल्याशिवाय राहत नाही अशा अर्थाची एक ग्रामीण भागात एक म्हण आहे. याचा प्रत्यय कलाकार मंडळींच्या बाबतीत तर अनेकवेळा येतो. 'लव्ह लफडे' नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा लेखक संजय मोरे व्यवसायाने इंजिनीयर आहे तर दिग्दर्शक सचिन आंबात चक्क एमबीए आहे. या सिनेमाचे लेखक संजय मोरे हे ‘सिटियस टेक’नावाच्या सॉफ्ट्वेअर कंपनी मध्ये कार्यरत आहेत. या दोघांनी मिळून बिर्याणी नावाचा लघुपट तयार केला होता. या लघुपटाला राष्ट्रीय स्तरावरील विविध चित्रपट महोत्सवातील ८ पुरस्कार मिळाले. काळा घोडा आर्ट फेस्टिवल २०१५ मध्ये बिर्याणी लघुपटाला खुल्या प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. त्यावरुन प्रेरित होऊन त्यांनी व्यावसायिक चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. ३० मिनीटाच्या बिर्याणी या लघुपटासाठी ४०,००० रुपये खर्च आला तर दोन तासाच्या चित्रपटाला २ लाख खर्च येईल असं साधं गणित त्यांनी मांडले व आपला चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरु केला.

 

मात्र सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि कोणताही पूर्ण दोन तासाचा चित्रपट हा २ लाख रुपयांमध्ये तयार होणे खूपच जिकिरीचे आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्तम करायचा असेल तर चित्रपटाचे बजेट चांगले असले पाहिजे हे या दोघांनाही पटले. त्यातून निर्मात्याचा शोध सुरु झाला. या शोधातूनच मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रियेशन्सच्या सुमेध गायकवाड यांनी चित्रपट निर्मितीचा भार उचलण्याची तयारी दर्शवली. यामुळे सचिन आंबत व संजय मोरे या दोघांना हुरुप आला व त्यांनी जीव ओतून ‘लव्ह लफडे’ चित्रपटासाठी काम केले. चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज असून २१ जून रोजी तो प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता एचसीसी (होम सिनेमा कॉन्सेप्ट) मोबाईल अॅप वर प्रदर्शित होणार आहे. अशा प्रकारे एचसीसी (होम सिनेमा कॉन्सेप्ट) मोबाईल अॅपवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

 

रवी जाधव यांच्या बी.पी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचलेला चेहरा म्हणजे रोहित फाळके आणि ’प्रेम हे’, तुझ्या वाचून करमेना, बे दुने दहा, प्रिती परी तुझ्यावरी अशा विविध सिरियल मधून दिसलेला चेहरा म्हणजे रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता सुमेध गायकवाड लव्ह्गुरुच्या भूमिकेत आणि अस्सं सासर सुरेख बाई सिरियल फेम अभिनेत्री मोनिका दबडे देखील मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत. तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'लव्हलफडे' चित्रपटासंबंधित काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...