आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत मॉरीशसमध्ये हनीमून सेलिब्रेशन करतेय ही अभिनेत्री, आर्किटेक्ट तरुणासोबत थाटला आहे संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  'कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’यांसारख्या मालिकेतून काम केलेली अभिनेत्री मधुरी देशपांडे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आता सध्या ती मॉरिशस येथे तिच्या हनीमून सेलिब्रेशनसाठी पोहोचली आहे. मधुराने सिनेसृष्टीतील नव्हे तर तिचा फॅमिली फ्रेंड असलेल्या आशय गोखलेसोबत संसार थाटला आहे. हे दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्या या हनीमून ट्रीपचे फोटो शेअर करत आहेत. जानेवारीमध्ये अडकली विवाहबंधनात..

 

जानेवारीमध्ये अडकली विवाहबंधनात..

मधुराने यावर्षी 20 जानेवारी रोजी आशयसोबत सात फेरे घेतले आहेत. या दोघांचा गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता. मधुराचा जोडीदार आशय हा मुळचा पुण्याचा असून तो ‘रिबन्स अॅण्ड बलून्स’मध्येही तो पार्टनर म्हणून कार्यरत आहे. आशय आणि मधुरा हे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यामुळे एकमेकांना ते चांगलेच ओळखतात. एका मुलाखतीत मधुराने आशयबद्दल सांगितले, की "आशय आणि मी एकमेकांना खूप चांगले ओळखतो. आमचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळा असला तरी आम्ही एकमेकांना पुरक आहोत असे मला जाणवले आणि मी लग्नाचा निर्णय घेतला. आशयची फॅमिलीही माझ्या करिअरला प्राधान्य देते त्यामुळे मी खूप समाधानी आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मधुरा-आशय यांचे हनीमूनदरम्यानचे तसेच त्यांचा वेडींग अल्बमसुद्धा...

बातम्या आणखी आहेत...