आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आपला मानूस\' चित्रपटाच्या प्रिमीयरला पोहोचली \'बकेटलिस्ट\'ची टीम, ब्लॅक ड्रेसमध्ये माधुरी दिसली फारच सुंदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित नाना पाटेकर यांचा चित्रपट 'आपला मानूस'च्या प्रिमीयरला पोहोचली. यावेळी केवळ माधुरीच नव्हे तर तिचा आगामी मराठी चित्रपट 'बकेटलिस्ट'च्या टीमसह ती येथे पोहोचली होती. 
 
मुंबईतील पीव्हीआर आयकॉन येथे हा प्रिमीयर पार पडला. माधुरीच्या उपस्थितीने तेथील सर्वांचाच उत्साह दुणावला होता. काळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये माधुरी फार सुंदर दिसत होती. 
 
यावेळी माधुरीने आपला मानूस नाना पाटेकरसोबतही फोटोही काढले. नाना आणि माधुरी यांनी 'वजूद', 'प्रहार', 'परिंदा', 'मोहरे' 'मदर' यांसारख्या चित्रपटात सोबत काम केले आहे.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आपला मानूस चित्रपटाच्या प्रिमीअरदरम्यानचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...