आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - माधुरी दीक्षितचा पहिलावहिला मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट'चे शूटींग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर माधुरी दीक्षितचा साधा सिंपल लुक दिसला होता पण नेमकी या चित्रपटात माधुरीची भूमिका काय हे अजून समोर आले नाही. या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर माधुरीने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात ती सर्वांना मिस करत असल्याचे सांगितले आहे.
माधुरीने या चित्रपटाचे आऊटडोर शूटिंग सिंगापूर येथील लंगकवी येथे पूर्ण केले तसेच चित्रपटाचा काही भाग पुण्यातही शूट झाला आहे. माधुरीने या चित्रपटादरम्यान बाईक रायडिंगही केली आहे. या सर्व शूटदरम्यान माधुरीने संपूर्ण टीमसोबत जी काही धमालमस्ती केली त्याचे काही खास फोटोज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, माधुरी दीक्षितचे 'बकेटलिस्ट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे On location Photos..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.