आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:चित्रपटाच्या सेटवर अचानकपणे दाखल झाली \'धक धक गर्ल\' माधुरी, पती श्रीराम नेनेही होते सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वांनाच माहिती आहे की माधुरी दीक्षित लवकरच 'बकेटलिस्ट' या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता काही दिवसांपूर्वीच माधुरीने अजून एक खुशखबर अशी दिली आहे की ती आता एका मराठी चित्रपटाची निर्मितीही करत आहे. माधुरीचा मराठीतील पहिलाच प्रोडक्शन असलेला '15 ऑगस्ट' या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले आहे आणि माधुरीने नुकत्याच केलेल्या एका फेसबुक लाईव्हद्वारे माधुरीने भेट दिली. माधुरीने यावेळी कॅमेऱ्यामाघील तिच्या काही कलाकार-तंत्रज्ञांची ओळखही करुन दिली.  

 

माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिचे पती श्रीराम नेनेही दिसत आहेत आणि त्यांनीही यावेळी सेटला भेट दिली. योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी चित्रपटाची निर्मिती करत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा माधुरीचा '15 ऑगस्ट' चित्रपटाच्या सेटवरील व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...