आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अवॉर्ड सोहळ्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली धक-धक गर्ल, श्रेयासोबत खेळली फुगडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी रात्री मुंबईत झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती धक-धक गर्ल माधुरी दीक्षित. माधुरीची दिलखेचक अदा झी चित्र गौरवच्या मंचावर बघायला मिळाली. निळ्या रंगाच्या साडीत माधुरी मंचावर अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यावेळी मराठी स्टार्सना माधुरीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी मंचावर माधुरी चक्क चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेसोबत फुगडी खेळताना दिसली.   

 

माधुरी लवकरच बकेटलिस्ट या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्यामुळे तिच्या मराठीतील पदार्पणाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.   

 

या पॅकेजमधून बघा, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील माधुरीची खास अदा छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...