आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पहिल्या चित्रपटाचे शूटिंग झाले सुरु, समोर आले चित्रपटाचे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बकेटलिस्ट' चित्रपटातून माधुरी दीक्षित लवलकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता केवळ अभिनेत्रीच नाही तर माधुरी मराठी चित्रपटाची निर्मातीही बनली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 15 ऑगस्ट. काही दिवसांपूर्वी माधुरीने तिच्या ट्वीटरवरुन ती मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी त्या चित्रपटाचे नाव समोर आले नव्हते. 

माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचे समजते. या चित्रपटाचे काही फोटो समोर आले असून त्यात आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने निर्मात्याच्या खूर्चीत बसलेले दिसत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या चित्रपटासंबंधित काही फोटो....

बातम्या आणखी आहेत...