आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप सीन शूटनंतर बिथरली होती माधुरी दीक्षित, भीतीने व्हिलनला म्हणाली 'मला हात लावू नकोस'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री माधुरी दीक्षित आगामी चित्रपट बकेटलिस्टद्वारे आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. विशेष म्हणजे माधुरीचा हा पहिलावहिला मराठी चित्रपट आहे. गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरीने अऩेक सुपरहिट चित्रपटात काम केले. यादरम्यान माधुरीला अनेक चांगल्यावाईट गोष्टींचा सामना करावा लागला. आज माधुरीच्या रिल आयुष्यातील अशीच एक घटना घेऊन आलो आहोत. 

 

80 च्या दशकातील गोष्ट आहे. हा तो वेळ होता जेव्हा माधुरी दीक्षित नवीनच इंडस्ट्रीत आली होती. त्यावेळी माधुरीने एक चित्रपट केला होता ज्याचे नाव होते 'प्रेम प्रतिज्ञा'. या चित्रपटात माधुरीच्या हिरोची भूमिका मिथुन चक्रवर्तीने केली होती आणि व्हिलनची भूमिका रंजीतने केली होती. या चित्रपटातील एका रेप सीनच्या शूटिंगदरम्यान माधुरी इतकी घाबरली होती की, यानंतर तिने रंजीतला तिने हात लावण्यासही मनाई केली होती. या चित्रपटात रेप सीन महत्त्वाचा सीन होता आणि माधुरी तो करण्यासही तयार होती पण शूटिंगअगोदर तिच्या मनात फार भीती होती..
80 च्या दशकात रंजीत प्रसिद्द व्हिलनपैकी एक होते. चित्रपट प्रेम प्रतिज्ञाची कथा पाहता त्यात एक रेप सीन टाकला गेला होता. यात व्हिलन रंजीत माधुरीवर रेप करतो. सीनच्या शूटिंगअगोदरची सर्व तयारी झाली होती आणि माधुरीही तयार होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, सीनच्या शूटिंगअगोदर तिच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते की ती हा सीन कसा देईल?

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, चित्रपटातील या सीनबद्दल काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...