आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: माधुरी दीक्षित प्रथमच मराठी चित्रपट निर्मितीक्षेत्रात, पती श्रीराम नेने यांचीही मिळाली साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित लवकरच आपल्याला मराठी चित्रपट बकेटद्वारे भेटीस येणार आहे. पण मराठी चित्रपटरसिकांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे की माधुरी आता मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही उतरली आहे. माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. माधुरीने स्वतः ही ट्वीट करुन माहिती दिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत ट्वीट केले आहे की, Filmmaking, the ultimate team sport. Our producer's journey begins! #15thAugust #comedy.

 

या चित्रपटाचे नाव अजून समोर आले नसून हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचे समजते. या चित्रपटाचे काही फोटो समोर आले असून त्यात आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

 

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने निर्मात्याच्या खूर्चीत बसलेले दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या चित्रपटासंबंधित काही फोटो आणि व्हिडिओही...

बातम्या आणखी आहेत...