आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर करण जोहरसोबत अवतरणार 'धक-धक गर्ल'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या'च्या इतिहासात आजपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली, आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांची.  माधुरी  'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली तो आपला पहिला वाहिला मराठी चित्रपट घेऊन ‘बकेट लिस्ट’.  


यावेळी चला हवा येऊ द्या टीम ने 'हम आपके है कौन'वर स्किट करून धमाल उडवून दिली. या कार्यक्रमासाठी करण जोहर हे देखील उपस्थित होते. याशिवाय सुमीत राघवन, रेणुका शहाणे यांनीही या प्रमोशनमध्ये आपला सहभाग नोंदवला. ‘बकेट लिस्ट’ टीमसोबत माधुरीने आपला वाढदिवस साजरा केला. 


करण जोहर यांना आपला 'हवा येऊ द्या'च्या सेटवरचा अनुभव विचारला असता ते म्हणाले. “माझ्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी मी या मंचावर परत येईन. या निमित्ताने गेली ४ वर्ष अविरत प्रेक्षकांना हसवणाऱ्या या टीम मध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.” ‘चला हवा येऊ द्या’ चा हा झी मराठीवर येत्या सोमवार आणि मंगळवारी  21 आणि 22 मे ला रात्री 9.30 वा. प्रसारित होणार आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'चला हवा येऊ द्या' मंचावरील माधुरीसह इतर कलाकारांची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...