आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितने डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा, 18 वर्षांपूर्वी केले होते अरेंज मॅरेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने नुकताच तिचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांचा वाढदिवस साजरा केला. माधुरीने सोशल मीडीया अकाउंटवर डॉ. नेने यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि त्यांच्यासाठी प्रेमळ संदेशही लिहीला. यावेळी तिने लिहीले, तुम्ही माझ्या आयुष्यात असल्याबद्दल आभार...

 

अभिनेत्री माधुरी दीक्षित नव्वदीच्या काळात सर्वांचीच ड्रिमगर्ल होती. प्रत्येकजण माधुरीच्या अदांवर अक्षरशः फिदा होता. पण अचानक तो दिवस आला आणि माधुरी झाली डॉक्टर नेनेंची. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरीने युएसए येथे लग्न केले. माधुरी आणि श्रीराम यांचे हे पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. माधुरीने तिने कोणाशी लग्न करावे हा निर्णय तिच्या आईवडिलांवर सोडला होता आणि माधुरीच्या बहिणीने तिच्यासाठी श्रीराम नेने यांचे स्थळ सुचवले. विशेष म्हणजे अमेरिकेत सेटल झालेल्या श्रीराम यांना माधुरीच्या स्टारडमची अजिबात कल्पना नव्हती. लग्नापूर्वी त्यांनी माधुरीच्या चित्रपटांच्या काही सीडी आणल्या होत्या. त्याअगोदर माधुरी दीक्षित अभिनेत्री आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. 

 

माधुरीचे लग्न साध्या पद्धतीने अमेरिकेत पार पडले. अतिशय गुपचूप पद्धतीने हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला आणि या विवाहानंतर माधुरीचे विश्वासू मॅनेजर रिक्कु राकेशनाथ यांनी माधुरीने विवाह केल्याचे जगासमोर आणले आणि तिच्या फॅन्सला धक्का बसला. विवाहानंतर माधुरी आणि श्रीराम अमेरिकन आईसलँडवर हनीमून सेलिब्रेशनसाठी गेले आणि तेथून परतल्यानंतर मुंबईत थाटामाटात रिसेप्शन दिले. 

 

आज माधुरी तिच्या वैवाहित आयुष्यात सुखात आहे आणि तिच्या संसारवेलीवर गोंडसरुपी दोन मुले फुलली आहेत.  आरिन आणि रेयान अशी त्यांची नावे आहेत. माधुरी लवकरच मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट'मधून मराठी सिनेसृष्टीत तिचा डेब्यू करत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, माधुरीच्या रिसेप्शनचे आणि फॅमिलीसोबतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...