आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Madhuri Dixits Bucket List A Must Watch Film का बघायला हवा माधुरी दीक्षितचा Bucket List, वाचा ही 6 कारणे

माधुरीच्या फॅन्ससाठी ट्रीट आहे Bucket List, का बघायला हवी फिल्म, वाचा ही कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या आयुष्यात इच्छा अाकांक्षाची यादी असते. मात्र, जीवन जगताना आपल्याला इच्छा आकांक्षा आहेत,याचाच विसर पडतो. एका मुलीची अधुरी यादी पुर्ण करताना गृहिणीला गवसणारे स्वत्व सांगणारा चित्रपट "बकेट लिस्ट' आहे. माधुरी दिक्षितचे चाहते असलेल्यांनी पहावा असा हा चित्रपट आहे. जाणून घेऊयात काय आहेत चित्रपटाची वैशिष्ट्ये... 

 

माधुरीने साकारलेली     मधुरा गृहिणींना आपलीशी वाटणारी... 
माधुरी दिक्षितचा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने संपूर्ण चाहता विश्वाचे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. त्यात करण जोहरच्या धर्मा प्रॉक्शनने निर्मिती केल्याने चित्रपटाला निराळेच वलय आहे. मराठीतील ही कहाणी महिला वर्गाला विशेषत: गृहिणींना आपलीशी वाटेल अशी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला माधुरीला अशा व्यक्तिरेखेत स्वीकारणे जड जाते. मात्र, हळुहळू तिच्यातील "मोहिनी' पूढे येते अन् प्रेक्षक खूश होऊन जातो. अस्सल मराठमोळे ब्राह्मण कुटूंब अन त्यातील सोहळे पाळणारी गृहिणी माधुरीने अचूक साकारली. पण, अवखळ अन नटखट माधुरीला सर्वच मिस करतात. माधुरी म्हणजे धमाल अन् खळखळत हास्य हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात घट्ट झाले आहे. ती नटखट माधुरी चित्रपट मध्यावर आल्यावर हळूहळू दिसू लागते. 


पुढे वाचा, का बघायला हवा 'बकेट लिस्ट'.. 
 

 

बातम्या आणखी आहेत...