आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच चित्रपटाच्या पार्टीत तब्बल 2 तास उशीरा पोहोचली होती माधुरी दीक्षित, होता शाळकरी लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - माधुरी दीक्षित लवकरच 'बकेटलिस्ट' या चित्रपटाद्वारे आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरीचा लुक अतिशय घरगुती दिसत आहे. गेल्या 14 जानेवारीला या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले तेव्हा मराठी प्रेक्षकांच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण त्यांची बॉलिवूडमध्ये एक बडे प्रस्थ असलेली त्यांची लाडकी अभिनेत्री आता हिंदीनंतर मराठीत दिसणार आहे. 

 

माधुरी दीक्षित आतापासूनच चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी झाली आहे आणि मग तो कोणा मराठी चित्रपटाचा प्रिमीअर असो अथवा मराठी अवॉर्डस कार्यक्रम माधुरी जातीने या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. आज माधुरीच्या काही जुन्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत ते म्हणजे माधुरी दीक्षितच्या पहिल्या चित्रपटाची पार्टी कशी होती आणि त्यादरम्यान काय-काय घडले होते. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्या 'यादगार पल' या पुस्तकातून आम्ही हा खास किस्सा माधुरीच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. 

 

अगदी शाळकरी दिसत होती माधुरी दीक्षित..
ऑगस्ट 1984 साली माधुरी दीक्षित अबोध या राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार होती. त्या काळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात होती. यादरम्यानच बनवला गेलेला अबोध चित्रपटात झळकणाऱ्या माधुरी दीक्षित आणि बंगाली चित्रपटांतून हिंदीत आलेल्या तापस पॉल यांची मुंबईतील पत्रकारांशी ओळख करुन देण्यासाठी पार्टीचे आयोजन मरीन ड्राईव्ह येथील नटराज हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी दीक्षित आडनावाची मुलगी हिंदी चित्रपटांत अभिनेत्री कशी बनू शकते, असा प्रश्न तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच पडला होता. 

 

तब्बल 2 तास उशिरा आली होती माधुरी दीक्षित..
राजश्री प्रोडक्शनच्या या पार्टीत निर्माता-दिग्दर्शक-कलाकार आणि काही तंत्रज्ञ एका रांगेत बसायचे आणि चित्रपटावर एक-एक करुन भाषणे द्यायचे अशी पद्धत होती. त्यानुसार ताराचंद बडजात्या आणि त्यांचे तीन मुले निर्माते म्हणून हजरही होते. चित्रपटातील कलाकार तापस पॉलही यावेळी उपस्थित होता पण माधुरीचा कुठेही काहीच पत्ता नव्हता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांमध्ये पहिल्याच चित्रपटाच्या पार्टीला 2 तास उशीर करणारी ही अभिनेत्री काय असेल अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर झाली ती माधुरीची एंट्री. नुकतीच 12वी पास झालेली माधुरी आईवडिलांसोबत हसतमुखाने आली आणि ट्रॅफिक खूप असल्याने उशीर झाला असे सर्वांना सांगितले. 

 

चित्रपट झाला फ्लॉप..
माधुरी आणि त्यात दीक्षित हे मराठमोळे आडनाव, अगदी साधी शरीरयष्टी, बालिश चेहरा यांसारख्या गोष्टींमुळे ही मुलगी भविष्यात इतकी मोठी अभिनेत्री होईल आणि हिंदीच काय देशातील प्रत्येक अभिनेत्रीला करडी टक्कर देईल असे कोणालाही वाटले नव्हते. अगदी फक्त अनुभव म्हणून चित्रपटाच्या ऑडिशनला गेलेली माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इन्सटीट्यशन बनली आणि आजतागायत ती कायम आहे हे वेगळे काही सांगायला नको.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, माधुरी दीक्षितचे अबोध चित्रपटातील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...