आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सूर नवा ध्यास नवा\' कार्यक्रमातील महेश काळे सोशल मीडियावर, दिवसभर शेअर केले अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. कार्यक्रमातील स्पर्धकांच्या उत्तम गायकीमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेऊन कार्यक्रमातील परीक्षक महेश काळे यांनी कलर्स मराठी वाहिनीचे Facebook, Twitter & Instagram Page hack केले आहे. म्हणजे  महेश काळे संपूर्ण दिवस या माध्यमांद्वारे त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधला यादरम्यान काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या सोबत शेअर करणार आहेत. कलर्स मराठीने हाती घेतलेल्या प्रसिद्धीच्या या आगळ्यावेगळ्या टेक्निकला सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

 
महेश काळे हे पेजेस स्वत: सांभाळले आणि त्यांनी आतापर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या अमुल्य गोष्टींमधून काही निवडक आणि Special गोष्टी कलर्स मराठीच्या फेसबुक पेज, ट्वीटर आणि Insta वर शेअर केल्या आहेत. तसेच सकाळी सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर जाताना एक छानसा सेल्फी देखील आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी एक सोशल मेसेज देखील दिला आहे – “Guys do not type or use your phone while driving. I have taken this picture when the car was stopped”

 

महेश काळे यांनी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेले काही स्केचेस, चित्र देखील यादरम्यान शेअर केली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, महेश काळे यांचे खास Photos....

बातम्या आणखी आहेत...