आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सलमान खानला मराठी बिग बॉसमध्येही आमंत्रित करणार\', सांगताय सूत्रसंचालक महेश मांजरेकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वात वादग्रस्त आणि बोल्ड शो बिग बॉस आता मराठीत सुरु होणार आहे. येत्या 15 एप्रिलपासून बिग बॉस मराठीत सुरु होत आहे. यात अँकरच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी कलाकार-निर्माते महेश मांजरेकर दिसणार आहेत. रुबाबदार व्यक्तीमत्तव, कणखर नजर, तडफदार बोलणे यांसारख्या गुणांमुळे महेश मांजरेकर हा शो रंगवणार यात शंकाच नाही. या शोच्या निमित्ताने आमच्या प्रतिनीधींनी थेट महेश मांजरेकरांशी संवाद साधल्या आणि दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी महेश यांनी त्यांच्या लुकपासून ते सलमान खानपर्यंत  काही माहिती आमच्यासोबत शेअर केली आहे. पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर.

 

1)बिग बॉस सुत्रसंचालनावेळी तुमचा लुक फारच हटके आहे. खास शोसाठी हा मेकओव्हर करण्यात आला आहे का?
- नाही. माझा हा लुक आगामी चित्रपट साहो या साऊथ चित्रपटातील आहे. यात मी प्रभाससोबत काम करत आहे. मला हा लुक चित्रपटाचे शूटिंग होईपर्यंत कॅरी करावा लागणार आहे. बिग बॉस सुरु होण्याअगोदर चित्रपट संपेल असे मला वाटले होते पण तसे झाले नाही. या चित्रपटासाठी आम्ही आधी हैदराबाद, अबुधाबी आणि त्यानंतर यूरोपला जाणार आहोत. मला ही हेअरस्टाईल फारच कम्फर्टेबल वाटते कारण मला केस विंचरण्याची गरजच पडत नाही फक्त एक पोनी बांधली की काम संपले. (हसत)


2) बिग बॉस होस्ट करताना काही टीप्स सलमानकडून घेतल्या का? सलमान त्याच्या बिग बॉस अँकरिंगसाठी प्रसिद्ध आहे.
- मी जेव्हा बिग बॉसचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि प्रोमो शूट केले त्यानंतर सलमानला फोन करुन मी हा शो मराठीत करत असल्याचे सांगितले. सलमान त्यावेळी फार खूश झाला. त्याने मला फक्त काही टीप्स दिल्या त्या म्हणजे शोमधील कलाकारांशी आपुलकी ठेवणे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणे. केवळ एवढे केले तरी खूप आहे असे त्याने मला सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, मुलाखतीचा उर्वरित भाग...

बातम्या आणखी आहेत...