आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi:आस्ताद-राजेशवर बरसले महेश मांजरेकर, घेतली सर्वांचीच शाळा, म्हटले 'बिग बॉस बनू नका'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  काल रात्री बिग बॉसचा महेश मांजरेकरांसोबतचा एपिसोड पार पडला. या एपिसोडमध्ये बिग बॉसमधील बऱ्याचशा सदस्यांना फैलावर घेतले. यावेळी सर्वप्रथम महेश यांची टार्गेट केले. खुर्चीसम्राट टास्कदरम्यान आस्तादने त्याच्या टीमला सोडत दुसऱ्या टीमची बाजू घेतली आणि त्याचमुळे आपल्या स्वतःच्या टीमला हरवण्यासाठी आस्ताद दुसऱ्या टीमला जाऊन मिळाला. यावर आस्तादनेही तो त्याच्या टीमसोबत खेळला नाही हे सांगितले. 

 

तर दुसरीकडे जुईवर निशाना साधत महेश मांजरेकरांनी तिच्या खूर्चीसम्राट टास्कदरम्यान चक्कर येऊन पडण्याच्या कृतीला आणि मेधाच्या कचरा टाकण्याच्या कृतीची एकमेकांशी तुलना केली आणि कोण चुक आणि कोण बरोबर हे सांगितले.  यावेळी विनीत भोंडे आणि राजेश श्रृंगारपुरे यांना बिग बॉस बनण्याचा प्रयत्न करुन असा धमकीवजा सल्लाही त्यांनी दिला.  

सई आणि मेधा यांनी यावेळी टास्क करणे म्हणजे लोकांचा रोष ओढावून घेणे असे वाटत असल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सुशांत शेलार यावरही महेश मांजरेकर यांनी त्याला मेधा धाडे हिला शिव्या दिल्याबद्दल फऐलावर घेतले. एकूणच महेश मांजरेकर यांनी आस्ताद, राजेश, सुशांत, रेशम, जुई या सर्वांची चांगलीच शाळा घेतली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, वीकेंडकचा डाव दरम्यान महेश मांजरेकरांचे आणि बिग बॉस सदस्यांचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...