आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा अभिनेता दिसणार पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेत, राज ठाकरेंच्या उपस्थितीत झाली घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके ‘भाई’ अर्थातच पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.  दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी सुरू केली असून या बॅनरअंतर्गत महेश मांजरेकर यांनी पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून या  चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत.  

 

राज ठाकरे यांच्या हस्ते झाले पोस्टर लाँच... 
8 नोव्हेंबर 2018 पासून पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण जगभरात साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने याच काळात म्हणजेच 4 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


सागर देशमुख साकारणार पुलंची भूमिका... 
या चित्रपटात पुलंची भूमिका कोण साकारणार, चित्रपटाची कथा कोण लिहिणार, चित्रपटाचे संगीतकार कोण असेल याचा उलगडा सोमवारी झाला.  या चित्रपटात पुलंच्या भूमिकेत अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे. सागर प्रेक्षकांनी यापूर्वी हंटर आणि वायझेड या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. सुनिताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारणार आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत. यामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...