आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos:\'मैने प्यार किया\' चित्रपटाने पूर्ण केली 28 वर्षे, पाहा असा होता सेटवरील कलाकारांचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट  म्हणजे 'मैने प्यार किया'. रॉयल मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीनेही याच चित्रपटाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याकाळी यशाचे अनेक रेकॉर्ड तोडले. यातील कलाकार सलमान खान आणि भाग्यश्री यांना या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळाली. आज या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 28 वर्षे पूर्ण झाली आहेत पण आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो.

 

या चित्रपटादरम्यान प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलेले सूरज बडजात्या यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी सेटवर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या सवयीमुळे सलमान आणि भाग्यश्री त्यांना पत्नीसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देत असत. पण कामाला पूर्णपणे वाहून घेतलेले सूरज यांचा सेटवरील दिनक्रम चुकत नसे. सलमान आणि भाग्यश्री सेटवर धमालमस्ती करण्याचा एक क्षणही सोडत नसत.  आज या चित्रपटाच्या 28व्या वर्षपूर्तीनिमित्त सेटवरील काही खास फोटोज् तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'मैने प्यार किया'च्या सेटवरील काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...