आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 'या' नाटकामुळे जुळली शिल्पासोबत मकरंदची साताजन्माची गाठ, बघा लग्नाचे Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आज (22 जुलै) वाढदिवस असून त्यांनी वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 जुलै 1973 रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे त्यांचा जन्म झाला. 'मक्या' या नावाने ते प्रसिद्ध आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते मराठीतील सुपरस्टार झाले आहेत. मराठवाडा आणि येथील भाषेचा ठसा उमटवणारे मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचे हीरो आहेत. 


मकरंद आपले खासगी आयुष्य नेहमीच मीडियापासून दूर ठेवतात. त्यांची पत्नी शिल्पा यादेखील अभिनेत्री असल्याचे फारसे कुणाला ठाऊक नसावे. खास मकरंद अनासपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, त्यांच्या लग्नाची खास गोष्ट आणि सोबतच मकरंद-शिल्पा यांच्या लग्नाचे खास फोटोज पहिल्यांदाच तुम्हाला बघता येणार आहेत. 


मकरंद-शिल्पा यांचा आहे प्रेमविवाह...
मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि सिनेमांमधून कामे केली आहेत. 2000 साली सुरू झालेल्या 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पासोबत मकरंद यांची भेट झाली होती. याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. येथेच मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याविषयी सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोन्ही घरुन काहीच विरोध झाला नाही. 30 नोव्हेंबर 2001 रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, मकरंद-शिल्पा यांच्या लग्नाचे खास फोटोज...

बातम्या आणखी आहेत...