आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मकरंद अनासरपुरेंच्या \'सौ.\', अभिनेत्री म्हणून झळकल्या आहेत मोठ्या पडद्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा आज (22 जुलै) वाढदिवस असून त्यांनी वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 90च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या मकरंद यांनी आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मकरंद यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नीसुद्धा अभिनेत्री असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? शिल्पा अनासपुरे हे मकरंद यांच्या पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणजे 'जाऊबाई जोरात' या नाटकात एकत्र काम करत असतानाच शिल्पा यांच्यासोबत मकरंद यांची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. 2001 साली शिल्पासोबत मकरंद यांनी विवाह केला. 

 

मकरंद अनासपुरेंसोबत झळकल्या आहेत सिनेमात...
शिल्पा आता फारशा चित्रपटसृष्टीत अॅक्टिव नाहीत. पण त्यांनी लग्नानंतर जेवढे सिनेमे केले ते मकरंद यांच्यासोबतच. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' (2009), 'सुंबरान' (2010), 'तुक्या तुकविला नाग्या नाचविला' (2010), 'गड्या आपलं गाव बरं' (2013), 'कापुस कोंड्याची गोष्ट' या सिनेमांमध्ये मकरंद अनासपुरेंसोबत शिल्पा यांनी काम केले.  


इंटरनेटवर शिल्पा यांची निवडक छायाचित्रे उपलब्ध आहेत. पाहुयात, शिल्पा अनासरपुरे यांची निवडक छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...